मानव समाजाविषयी असणारी उत्तरदायित्वाची जाणीव, सामाजिक बांधिलकीची भावना, अंतरात असणार निर्मळ, निर्व्याज प्रेम आणि समर्पण, त्यागाची भावना असे आहेत, प्रेरणास्रोत आमच्या अमृतवेल व्यसनमुक्ती केंद्राचे. ‘यशवंत फाउंडेशन, अहमदनगर’ संचालित हे “अमृतवेल व्यसनमुक्ती केंद्र” असून इथे व्यसनी पीडित रुग्ण बांधवांची सेवा समर्पित भावनेतून केली जात असते. खरेतर हे मनोअध्यात्मिक साधना केंद्र आहे असे म्हणता येईल. इथे आयुर्वेदिक (पंचकर्म), होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, ऍलोपॅथी आणि संगीत थेरपी हिप्नोथेरपी, फिजिओथेरपी, मडथेरपी या सर्वांच्या मदतीने रुग्णमित्राला व्यसनमुक्त केले जाते. इतकेच नव्हे तर तज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन, प्रबोधन केले जाते. मनोविकार तज्ञ, कौन्सेलर, कर्मचारीवर्ग अशांचे पथक सेवेसाठी सदा तत्पर असते. योगा, प्राणायाम, औषधोपचार, मानसोपचार, समुपदेशन, प्रार्थना, सुविचारांची देवाण-घेवाण, रुग्णांशी सुसंवाद अशा माध्यमातून देखील उपचार रुग्ण मित्रांवर केले जातात.
सात्विक पोषक आहार, सात्विक विचारांचे वातावरण, रुग्ण मित्रांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करून कलेचा विकास घडवून मनोरंजनही केले जाते.
तीस दिवसांच्या इथल्या वास्तव्यात रुग्ण मित्रांची घरच्यासारखे आस्थेवाईकपणे आपुलकीने काळजीपूर्वक देखभाल केली जाते. इथले केंद्राचे वातावरण हसरे, खेळकर आणि दिलखुलास असते. रुग्ण मित्रांचा गेलेला आत्मविश्वास पुन्हा त्यांच्या मनात जागवून जीवन जगण्याची नवी आशा, नवी उमेद पुन्हा निर्माण केली जाते. रुग्णांची कुटुंबीयांविषयीची आत्मीयता, प्रेमभावना, श्रद्धा वाढवली जाते. त्याच्या मनातील भयगंड, न्यूनगंड दूर केला जातो. नैराश्य झटकून पुन्हा रुग्णमित्र नव्या उमेदीने, ताज्या उभारीने आनंदी जीवन जगण्यासाठी स्वयंसिद्ध होत असतो. जीवनात आरोग्याला खूपच महत्त्व आहे, ही भावना रुग्णाच्या मनी रुजवली जाते. आरोग्याविषयीची आस्था, आवड त्याच्या मनात निर्माण केली जाते. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था या विषयी आदरभाव, प्रेमभाव जागवून मनात अढळ श्रद्धाभाव जागविला जातो.
रुग्णांच्या मनात सहवास्तव्यातून पुलकित होणारे सहजीवन, सहअस्तित्वातून मानवी सद्गुण जोपासले जातात. अमृतवेल व्यसनमुक्ती केंद्राची अहमदनगर मधील जागा प्रशस्त, निसर्गरम्य, हवेशीर असून रुग्णांना खेळण्यासाठी खेळ मैदानही आहे. व्यायामाचे साहित्य देखील व्यायामासाठी उपलब्ध आहे. शारीरिक-मानसिक आणि व्यक्तिमत्व विकास देखील येथे घडवला जातो.
अनुभवी योगगुरू हे योगाचे प्रशिक्षण देऊन रुग्णमित्रांना प्रशिक्षित करत असतात. योगसाधनेमुळे रुग्णांचे लक्ष अन्यत्र वळवले जाते. तो व्यसनापासून दूर जातो. व्यसनमुक्ती केंद्रात पुस्तकांचे भव्य दालन असून वाचनाची आवड निर्माण केली जाते. स्वच्छ, शुद्ध विचारांनी सात्विक विचारांची प्रक्रिया मनात सुरू होत असते. इथे रुग्णांवर केवळ उपचारच नव्हे तर त्याचे खरे पुनर्वसन केले जाते. रुग्ण मित्रांना जीवनाचा खरा आनंद लुटता यावा, मौज मस्ती करता यावी म्हणून दर महिन्याला निसर्गाच्या सानिध्यात खुली आनंदी सफर घडवली जाते. व्यसनामुळे प्रदूषित झालेले त्यांचे विचार, त्यांचे मन पुन्हा नव्या उमेदीने, नव्या दमाने न्हाऊन निघते. प्रसन्न पावते. सिक्युरिटी देखील परफेक्ट असते. रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवेची गरज भासल्यास स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध असते.
रुग्णांना आपल्या घरी बोलता यावे, तसेच घरच्या कुटुंबियांना रुग्णाशी सहज बोलता यावे, म्हणून फोनची व्यवस्थाही आहे. रुग्ण बरा होऊन गेल्यावर देखील त्याच्याशी त्याच्या कुटुंबियांशी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सतत संपर्क साधून खुशाली जाणून घेतली जाते. रुग्णाच्या मनात नवी आशा, नवी दिशा निर्माण केली जाते. अमृतवेल व्यसनमुक्ती केंद्राची भूमिका ही पालकासारखखी समजूतदारपणाची, सलोख्याची असते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेमुळे इथे आलेली पीडित, व्यसनाधीन व्यक्ती ही स्वतःमध्ये बदल, सुधार घडावा, नव्याने उत्तम आयुष्य जगता यावे, यासाठी आलेली आहे, याची जाणीव अमृतवेल व्यसनमुक्ती केंद्राला असल्यानेच अगदी घरच्यासारखी प्रेमळ वागणूक इथे दिली जाते. अमृतवेल व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने, नव्या तंत्रज्ञानाने, प्रगत विचारांनी आणि अद्ययावत उपचार पद्धतीने केले जाते. सामाजिक बांधिलकी आणि रुग्णहीत कधीही डोळ्याआड केले जात नाही.