अमृतवेल व्यसनमुक्ति केंद्र हे अहमदनगर शहरालगतच. नदीकाठी असल्याने केंद्राच्या आजूबाजूला अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. केंद्राच्या अगदी शेजारीच अहमदनगरमधील प्रसिद्ध 'जलाराम बाप्पा मंदिर' असून त्या मंदिरात व लगतच्या परिसरात धार्मिक वातावरण असते.
सर्वप्रथम रूग्णाला विचारणे अतिशय योग्य असते. रूग्णाला व्यसनमुक्त होण्याची मनापासून इच्छा असेल तर तो व्यसनातून खूप लवकर बाहेर येतो. जर असे विचारणे शक्य नसल्यास आमच्या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून योग्य पद्धतीचा अवलंब करावा. रुग्ण प्रवेशीत होताना त्याच्यासोबत असणार्या नातेवाइकांनी एक फॉर्म भरून देणे आवश्यक असते.
वेळ | दिनचर्या |
---|---|
उठणे (गुड मॉर्निंग) | |
स. ०६:०० ते ०७:०० | स्वच्छता आंघोळ (तयारी करणे) |
स. ०७:०० ते ०७:३० | चहा |
स. ०७:३० ते ०९:०० | प्राणायाम, प्रार्थना, ध्यान |
स. ०९:०० ते ०९:३० | नाश्ता |
स. ०९:३० ते ११:०० | मेडिकल चेकअप |
स. ११:०० ते दु. १२:०० | व्यक्तिमत्व विकाससाठी व्याख्यान |
दु. १२:०० ते १२:३० | चर्चासत्र (प्रश्नोत्तरे) |
दु. १२:३० ते ०१:३० | सात्विक जेवण |
दु. ०१:३० ते ०३:३० | विश्रांती |
दु. ०३:३० ते ०४:०० | चहा |
दु. ०४:०० ते सं. ०५:०० | ग्रुप थेरपी (भावनांचे व्यवस्थापन) |
सं. ०५:०० ते ०६:०० | शारीरिक शिक्षण (खेळ) |
सं. ०६:०० ते ०७:३० | कौन्सिलिंग (सकारात्मक विचारांसाठी) |
सं. ०७:३० ते रा. ०८:०० | सांज भजन |
रा. ०८:०० ते ०९:०० | रात्रीचे जेवण |
रा. ०९:०० ते १०:०० | अनुभव, गप्पा व भविष्यवेध (Planning) |
रा. १०:०० ते स. ०६:०० | रात्रीची गाढ झोप |